‘रासप’ सरकारमध्ये आहे की बाहेर? हेच मला कळेनासे झाले आहे, अशी तिखट प्रतिक्रिया आमदार महादेव जानकर यांनी मांडली.
मुंबई- आमचा एकच आमदार आहे. पाठिंबा काढल्यास फडणवीस सरकार कोसळणार नाही. पाच आमदार असते तर भाजपाकडे भीक मागायची वेळ आली नसती. ‘रासप’ सरकारमध्ये आहे की बाहेर? हेच मला कळेनासे झाले आहे, अशी तिखट प्रतिक्रिया आमदार महादेव जानकर यांनी मांडली.
मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुम्हाला मंत्रीपद कधी मिळणार? असा प्रश्न विचारल्यावर, ‘आय अॅम नॉट डिमांडर फॉर कमांडर’ असे ते म्हणाले.
मंत्रीपद कशासाठी मागायचे? आमची लायकी काय? विधिमंडळात विचार नव्हे डोकी महत्त्वाची असतात, असेही त्यांनी सांगितले.