जाट समाजाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाचा शनिवारी भडका उडाला.
हरयाणा – जाट समाजाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाचा शनिवारी भडका उडाला. जिंद जिल्ह्यातील बुधा खेडा रेल्वे स्थानकात काहींनी रेकॉर्ड रूमला आग लावल्याने या आगीत महत्त्वाची कागदपत्रे व सरकारी मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. या जाळपोळीचा फटका रेल्वे वाहतुकीला बसून हरयाणामार्गे जाणा-या अनेक रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या.
रोहतकसह विविध भागात पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या आंदोलनाचे लोण अगदी दिल्लीपर्यंत पोहोचल्याने गुडगावमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, ही परिस्थिती हाताळण्यासाठी हरयाणातील रोहतक, जिंद, झझ्झर, भिवानी, हिस्सार, कैथल, पानिपत, सोनिपत, आणि कर्नाल या नऊ जिल्ह्यांत लष्कराच्या तुकडय़ा दाखल झाल्या असून ‘दिसताक्षणी गोळय़ा घालण्याचे’ आदेश देण्यात आले आहेत.
रोहतकमार्गे रस्त्यावर आंदोलकांनी ठिकठिकाणी चक्का जाम केल्याने दिल्ली, रोहतक आणि फाजिल्का महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी लष्कराला हॅलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. बुधा खेडा रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी काही व्यक्तींनी आग लावल्याने या आंदोलनाने पेट घेतला. या आगीत रेल्वे स्थानकातील फर्निचर, रेकॉर्ड रूम आणि इतर महत्त्वाच्या वस्तू जळून खाक झाल्याचे हरयाणा पोलिसांनी सांगितले. तणावजन्य परिस्थिती असलेल्या भागात लष्कराकडून (फ्लॅग मार्च) संचलन करण्यात आले असून हिंसक परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल, असा विश्वास हरयाणाचे पोलीस महासंचालक वाय. पी. सिंग यांनी व्यक्त केला आहे.
» नऊ शहरांतील
» जनव्यवहार विस्कळीत
» पाच शहरांत संचारबंदी
» दिसताक्षणी गोळय़ा
» घालण्याचे आदेश
» भाजपा खासदार राजकुमार सनी यांच्या घरावर हल्ला
» हरयाणातून सुटणा-या
» ५०० रेल्वे गाडय़ा रद्द
» रोहतकसह अनेक भागांतील शाळा-महाविद्यालये बंद
[EPSB]
जाट समुदायाच्या आंदोलनामुळे दिल्लीत पाणी संकट
हरियाणात सुरु असलेल्या जाट समुदायाच्या आंदोलनामुळे दिल्लीत पाणी संकट निर्माण झाल्याने सोमवारी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हरियाणामध्ये रेल्वे स्थानक जाळले
हरियाणात जिंद जिल्ह्यातील बुधा खेरा रेल्वे स्थानक आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकण्यात आले असून हरियानातील काही जिल्ह्यात लष्काराला पाचारण करण्यात आले आहे.
जाट आंदोलन पेटले; एक ठार, नऊ जखमी
हरियाणात सुरु असलेल्या जाट आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले असून पोलिसांच्या गोळीबारात एक जण ठार झाला. तर अन्य नऊ जण जखमी झाले आहेत.
[/EPSB]