जागतिक बॉक्सिंग स्पर्धेला सोमवारपासून (१४ ऑक्टोबर) अल्माटीत सुरुवात होत आहे.
अल्माटी (कझाकस्तान)- जागतिक बॉक्सिंग स्पर्धेला सोमवारपासून (१४ ऑक्टोबर) अल्माटीत सुरुवात होत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शिवा थापा (५६ किलो), मनोज कुमार (६४ किलो), थोकचोम ननाओ सिंग (४९ किलो), सुमीत सांगवान (८१ किलो) आणि मनप्रीत सिंग (९१ किलो) या भारताच्या पाच बॉक्सर्सना सलामीला पुढील फेरीत चाल (बाय) मिळाली आहे.
जागतिक स्पर्धेत प्रथमच उतरलेला मदन लाल (५२ किलो) सोमवारी सलामीला मोल्डोवाच्या अलेक्झांड्रस रिस्कनशी झुंजेल. त्यानंतर मंगळवारी (१५ ऑक्टोबर) विकाश मलिक (६० किलो) आणि मनदीप जांग्रा त्यांच्या प्रतिस्पध्र्याशी दोन हात करतील. सलामीला ‘बाय’ मिळालेल्या भारताच्या पाच बॉक्सर्सच्या दुस-या फेरीच्या लढती बुधवार आणि गुरुवारी होतील.
भारतीय बॉक्सिंग संघटनेवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाची (एआयबीए) बंदी असल्याने भारताचे बॉक्सर एआयबीएच्या ध्वजाखाली खेळणार आहेत. जागतिक स्पर्धेत ११६ देशांतील ५५० पेक्षा जास्त बॉक्सर्स सहभागी झाले आहेत.
विजेंदरवर भारताच्या आशा
जागतिक स्पर्धेत पदक पहिला बॉक्सर विजेंदर कुमारवर भारताच्या आशा आहेत. २००९ मध्ये पदक जिंकलेल्या विजेंदरची सलामीची लढत गुरुवारी (१७ ऑक्टोबर) स्वीडनच्या हॅम्पस हेन्रिकसनशी होईल. जागतिक स्पर्धेत विजेंदर चौथ्यांदा सहभागी होत आहे.