जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. गीता मित्तल यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीनगर- जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. गीता मित्तल यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मित्तल या जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्या आहेत.
गीता मित्तल या यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. ४ ऑगस्ट रोजी त्यांच्या बदलीचा आदेश केंद्र सरकारने जारी केला होता.
याशिवाय न्यायमूर्ती सिंधू शर्मा यांना जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा मान मिळाला आहे.