शोपियन जिल्ह्यात नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या सरपंचाची रविवारी रात्री दहशतवाद्यांनी गोळया झाडून हत्या केली.
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या सरपंचाची रविवारी रात्री दहशतवाद्यांनी गोळया झाडून हत्या केली.
मोहम्मद सुलतान भट असे मृत सरपंचाचे नाव आहे. नाझनीनपोरा येथील निवासस्थाबाहेर भट उभे असताना, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते ठार झाले.
दरम्यान जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ओमर यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. तसेच विधानसभा निवडणुकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे या प्रकरणी आपण कोणतेही पाऊल उचलू शकत नसल्याचे ओमर यांनी सांगितले