>> हिंदू धर्मात जप करण्याचे किंवा नामस्मरणाचे खास महत्त्व आहे. मंत्र जपण्यासाठी वापरण्यात येणा-या जपमाळेत १०८ मणी असतात; परंतु आपल्याला हे माहीत आहे का, की यातील मण्यांची संख्या ही १०८ का असते?
>> मान्यतेप्रमाणे माळेचे १०८ मणी आणि सूर्याची कला यात संबंध आहे. एका वर्षात सूर्य २,१६,००० कला बदलतो आणि वर्षात दोनदा आपली स्थितीही बदलतो. ६ महिन्यांचे उत्तरायण आणि ६ महिन्यांचे दक्षिणायन असतं. सूर्य ६ महिन्यांच्या एका स्थितीत १, ०८,००० वेळा कला बदलत असतो.
>> म्हणजे या संख्येतून (१,०८,०००) शेवटले तीन शून्य हटवून माळेतील १०८ मणी निर्धारित केले गेले आहेत. माळेतील एक-एक मणी सूर्यातील एक-एक कलेचा प्रतीक आहे. सूर्य हा एकमेव साक्षात दिसणारा देव आहे. यामुळे सूर्याच्या कलांवर मण्यांची संख्या निर्धारित केली गेली आहे.
>> असेही म्हणतात की, ज्योतिषशास्त्राप्रमाणे एकूण २७ नक्षत्र आहेत आणि त्यात एकूण १०८ चरण असतात. माळेतील एक-एक मणी एक-एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो.