सर्वसामान्य जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचे प्रयत्न करु, असे आश्वासन सोळाव्या लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
नवी दिल्ली- सर्वसामान्य जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचे प्रयत्न करु, असे आश्वासन सोळाव्या लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
लोकसभेच्या कामकाजासाठी पहिल्यांदाच संसद भवनात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रकारांनी बुधवारी सकाळी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी भाजपला बहुमत दिल्याबद्दल जनतेचे पुन्हा एकदा आभार मानले. तसेच सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
सोळाव्या लोकसभेचे कामकाज सुरू होताच हंगामी अध्यक्ष कमलनाथ यांनी लोकसभा सदस्यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आवाहन केले. त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.