विश्वनाथन आनंद आणि अव्वल मानांकित नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यात यावर्षी होणा-या जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी अद्याप एकाही देशाने यजमानपदाची तयारी दाखवलेली नाही.
नवी दिल्ली : विश्वनाथन आनंद आणि अव्वल मानांकित नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यात यावर्षी होणा-या जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी अद्याप एकाही देशाने यजमानपदाची तयारी दाखवलेली नाही.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) यजमान देश ठरवण्यासाठी निविदा दाखल करण्याकरता ३० एप्रिल ही अंतिम मुदत ठेवली होती. मात्र ‘‘अजूनपर्यंत फिडेने एकही निविदा स्वीकारलेली नाही. निविदा दाखल करण्यासाठी पुढील तारखेची घोषणा लवकरच करू,’’ असे फिडेने संकेतस्थळावर नमूद केले आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी चेन्नईत झालेल्या जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी कार्लसनच्या नॉर्वेने कंबर कसली होती. मात्र यंदा नॉर्वे तितका उत्सुक दिसत आहे. विशेष म्हणजे यंदा भारतीय बुद्धिबळ संघटनाही (एआयसीएफ) यजमानपद भूषवण्यासाठी उत्सुक नाही.