हिमाचल प्रदेशात बियास नदीत गेल्या आठवडयात २५ विद्यार्थी वाहून गेले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अचानक नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याची माहिती मिळाली नाही आणि हा अपघात घडला. हैदराबादमधून आलेल्या या मुलांपैकी काही मुलांचे मृतदेह हाती लागले तर काहींचे अद्याप लागलेले नाहीत. नदीत असलेल्या जलविद्युत प्रकल्पातून अचानक सोडण्यात आलेल्या पाण्याच्या लोंढयामुळे हा प्रकार घडला. मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईला आणि कोकणालाही मोठया प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे पावसाला सुरू झाला की, मुंबईतील समुद्रकिनारे धोकादायक म्हणून घोषित केले जातात. या किना-यावर खूप आतवर जाऊ नये तसेच भरतीच्या वेळा आधीच जाहीर करून लोकांना सावधान केले जाते. मात्र, असे करूनही काही उत्साही तरुण रिमझिम पडणा-या पावसाच्या सरी अंगावर घेण्यासाठी समुद्रावर जाण्याचा मोह आवरत नाहीत आणि मग त्यातूनच काही दुर्दैवी अपघात घडतात. त्यात तरुणांना प्राणही गमवावे लागतात. मुंबईतील मरीन ड्राइव्ह समुद्रकिनारा हाही मुंबईसह देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. गेले तीन दिवसात समुद्राचे पाणी भरतीमुळे थेट रस्त्यावर आले होते. समुद्रातील सगळे घाण समुद्राने पुन्हा रस्त्यावर आणली होती, एवढी ही भरती मोठी होती. मात्र, डोंबिवलीतील एका तरुणाच्या जिवावर हा उत्साह आणि भरती बेतली. रविवारी दुपारी चारच्या सुमाराला काही डोंबिवलीकर तरुण समुद्राच्या लाटांचे आणि लाटासोबत स्वत:चे छायाचित्र काढण्यात मग्न होते. जोरात आलेल्या लाटांमुळे बेसावध असलेल्या चेतन चव्हाण हा तरुण समुद्रात वाहून जाऊ लागला. त्याचवेळी त्याच्या मोठया भावाने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्यात बुडणारा भाऊ वाचला आणि दुर्दैवाने त्याचा मोठा भाऊ यात मृत्युमुखी पडला. भरतीमुळे लाटांनी रौद्ररूप धारण केलेले आहे आणि महत्त्वाच्या चौपाटयांवर जीवरक्षकही तैनात केले गेले आहेत. पावसामुळे आणि त्याच वेळी आलेल्या भरतीमुळे कोकणातील अनेक किनारपट्टीजवळ असलेल्या गावांना याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे पालिकेने किंवा संबंधित यंत्रणेने दिलेल्या सावधानतेच्या इशाराचे नीट पालन करणे आवश्यक आहे. अजूनही पाऊस म्हणावा तसा सुरू झालेला नाही. या पार्श्वभूमीवर, अतिउत्साहाने धाडस करण्याचे तरुणांनी टाळले पाहिजे. लोकांनी सर्वसाधारणपणे नियम पाळावे, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जाते. पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर, वाहनचालकांपासून सगळयांनीच नियम पाळणे आवश्यक आहे. नियम पाळले तर धोका टळू शकतो. चौपाटयांवर जरूर जा; पण तिथेही सुरक्षेचे नियम पाळले गेले पाहिजे.
चौपाटयांवर जाताय.. पण जरा जपून
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on