चेंबूर येथील वत्सलाताई नाईक नगर झोपडपट्टी परिसरातील एका गोदामाला मंगळवारी भीषण आग लागली.
मुंबई- चेंबूर येथील वत्सलाताई नाईक नगर झोपडपट्टी परिसरात मंगळवारी भीषण आग लागली. येथील एका गोदामाला ही आग लागली होती. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चेंबूर भागातील नेहरुनगरमध्ये टायर बनवणा-या कंपनीच्या एका गोदामाला ही आग लागली. हे गोदाम रहिवासी भागात आहे. आगीची तीव्रता एवढी होती की, आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. खबरदारी म्हणून पुर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक थांबवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
आगीची खबर मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.