पूर्व चीनमधील जियांग्सु प्रांतातील यांगत्से नदीत एक बोट बुडाल्याने २२ जणांचा मृत्यू झाला.
बीजिंग- पूर्व चीनमधील जियांग्सु प्रांतातील यांगत्से नदीत एक बोट बुडाल्याने २२ जणांचा मृत्यू झाला.
या बोटीवरील एकूण २५ प्रवाशांपैकी तीन जण सुरक्षित आहेत. तर एकजण अद्यापही बेपत्ता असून त्याचे राष्ट्रीयत्व जाहीर करण्यात आलेले नाही.
या बोटीत आठजण विदेशी होते. यात चार सिंगापूर, एक भारतीय, एक इंडोनेशियन, एक मलेशियन आणि एका जपानी नागरिकाचा समावेश आहे. यात समावेश असलेला भारतीय हा सिंगापूरचा रहिवासी आहे.