संयुक्त संसदीय समितीच्या प्रमुखपदावरुन पी.सी.चाको यांना हटविण्याची विरोधीपक्षांची मागणी लोकसभाअध्यक्ष मीरा कुमार यांनी गुरुवारी फेटाळून लावली.
नवी दिल्ली – २ जी स्पेक्ट्रम घोटाळयाची चौकशी करणा-या संयुक्त संसदीय समितीच्या प्रमुखपदावरुन पी.सी.चाको यांना हटविण्याची विरोधीपक्षांची मागणी लोकसभाअध्यक्ष मीरा कुमार यांनी गुरुवारी फेटाळून लावली. संसदीय समितीच्या प्रमुखाला हटविण्यासाठी नियमांमध्ये तरतुद नसल्याचे सांगत मीराकुमार यांनी ही मागणी फेटाळली.
जेपीसी सदस्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये मीराकुमार यांनी, सर्व सदस्यांना सर्वमान्य तोडगा काढण्याची विनंती केली आहे. वादातून लवकरात लवकर मार्ग काढून संसदेसमोर अहवाल सादर करावा असे मीरा कुमार यांनी सांगितले आहे.
जेपीसीमधील विरोधीपक्षांच्या पंधरा सदस्यांनी चाको यांच्यावर अविश्वास दाखविला असून, त्यांना लवकरात लवकर पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. यामध्ये संपुआचे जुने सहकारी डीएमके आणि तृणमुल काँग्रेसचाही समावेश आहे.
जेपीसीच्या अहवालात पंतप्रधान मनमोहन सिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री पी.चिंदबरम यांनी क्लीनचीट देण्यात आली आहे. यावरुन विरोधीपक्षांनी चाको यांना हटविण्याची मागणी केली आहे.