जागतिक बाजारातील मंदीचा फटका चहा उद्योगालाही बसला आहे.
नवी दिल्ली- जागतिक बाजारातील मंदीचा फटका चहा उद्योगालाही बसला आहे. उत्तर आणि दक्षिण भारतातील घटलेल्या निर्यातीमुळे चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यांमध्ये निर्यातीत २० टक्क्यांची घट झाली. चहा मंडळाच्या आकडेवारीनुसार या कालावधीमध्ये आठ कोटी १८ लाख बॅगची निर्यात झाली.
उत्तर आणि दक्षिण भारतातील चहाच्या निर्यातीमध्ये १० टक्क्यांची घट आहे. तर दक्षिण भारतातील निर्यातीमध्ये ३१ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये भारतातून १० कोटी २६ लाख बॅगांची निर्यात करण्यात आली होती. चहा उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. गेल्या वर्षात चहाच्या निर्यातीमध्ये १३ टक्क्यांची घट झाली होती.