चर्नीरोड रेल्वे स्थानकाजवळील आत्मज नावाच्या १५ मजली इमारतीला रविवारी सकाळी आठच्या सुमारास आग लागली.
![fire](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/11/delhi-fire.jpg)
मुंबई- चर्नीरोड रेल्वे स्थानकाजवळील आत्मज नावाच्या १५ मजली इमारतीला रविवारी सकाळी आठच्या सुमारास आग लागली. या आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. त्यानंतर धुरात अडकलेल्या रहिवाशांना जवानांनी बाहेर काढले.
गवालिया टॅंक परिसरात आत्मज नावाजी १५ मजली इमारत असून या इमारतीच्या मीटर चेंबरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.