दक्षिण गोव्यातील मडगावपासून २० कि.मी. अंतरावरील बेतूल पठारावर सोमवारपासून डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.
पणजी- दक्षिण गोव्यातील मडगावपासून २० कि.मी. अंतरावरील बेतूल पठारावर सोमवारपासून डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून चार दिवस चालणा-या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते होणार आहे.
तिन्ही सेनादल प्रमुख या वेळी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या प्रदर्शनात रशियाच्या पाचशे जणांचा समावेश असलेले जम्बो प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे. रशियन बनावटीची हेलिकॉप्टर्स आणि अन्य युद्धसामग्री या प्रदर्शनात प्रदíशत करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात संरक्षण क्षेत्राशी संबंधित विविध सामग्री असेल. त्यात विविध प्रकारची हत्यारे, सनिकांचे गणवेष ते क्षेपणास्त्रे यांचा समावेश असणार आहे. ३१ मार्च रोजी हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. सुमारे ४० देश या प्रदर्शनात सहभाग घेणार आहेत. त्या देशातील लष्करी साहित्य उत्पादक कंपन्यांचे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत.
देश-विदेशातील एक हजारापेक्षा अधिक कंपन्या या प्रदर्शनात सहभाग घेत आहेत. प्रदर्शनात बोफोर्स तोफ, क्षेपणास्त्रे, लढावू वाहने, ट्रक्स, अवजड सामान वाहून नेणारी वाहने या भारतीय आणि अमेरिकन, इस्रईल, रशिया, जर्मनी, फ्रान्स, कोरिया यांसारख्या देशात बनवलेली शस्त्रास्त्रे आणि युद्धसामग्री यांचा समावेश असेल. अमेरिकन बनावटीची टीओएफ एम ७७७ ही खास तोफही विशेष आकर्षण ठरणार आहे.