तेलंगण मुद्दयावरून लोकसभेत गदारोळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेशच्या नऊ खासदारांना सोमवारी निलंबित करण्यात आले.
नवी दिल्ली– तेलंगण मुद्दयावरून लोकसभेत गदारोळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेशच्या नऊ खासदारांना सोमवारी निलंबित करण्यात आले. यामध्ये कॉँग्रेसच्या पाच आणि तेलुगू देसम पक्षाच्या चार खासदारांचा समावेश आहे.
सोमवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच आंध्र प्रदेशच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. टीडीपीच्या सदस्यांनी हौद्यात धाव घेऊन तेलंगणविरोधात घोषणा द्यायला सुरूवात केली. कॉँग्रेसच्या खासदारांनीही पुढे येऊन आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे अध्यक्ष मीरा कुमार यांनी ३७४-अ या नियमानुसार नऊ खासदारांचे नावे पुकारून त्यांना निलंबित केले आणि सभागृह दोन वाजेपर्यंत तहकूब केले.
विशेष म्हणजे याआधी २३ ऑगस्ट रोजी तेलंगणच्याच मुद्दय़ावरून बारा खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले होते.