उन्हाळा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे घरातून निघताना स्कार्फ, गॉगल, पाणी आदी साहित्य घेऊनच तुम्ही बाहेर पडत असाल. काहींना गॉगल शोभत नाहीत तर काहींच्या चेह-यापेक्षाही मोठा दिसतो. त्यामुळे गॉगल खरेदी करताना तुमच्या चेह-याच्या शेपप्रमाणेच गॉगल निवडा. उन्हात गॉगल्स लावून निघणे फॅशन नसून आवश्यकता आहे. परंतु फॅशनेबल गॉगल्सने व्यक्तिमत्त्वात भर पडते. जर आपणही गॉगल्स घ्यायला जात असाल किंवा स्टाईलिश दिसण्याची इच्छा असेल तर या टिप्स नक्कीच वाचा.
» आपल्या चेह-याच्या त्वचेनुसार योग्य रंगाची फ्रेम निवडा. पांढरा आणि सिल्वर भडक दिसतो. हलका गोल्डन, काळा, ब्राउन रंगाची फ्रेम चांगली दिसते. तसेच गडद निळी फ्रेम चेह-यावरील डाग लपवण्यात मदत करते. लाल फ्रेम चंकी-फंकी असल्यामुळे रेग्युलर यूज करणे योग्य ठरणार नाही.
» ओव्हल फ्रेम ओव्हल चेह-यावर सूट करत नाही. स्क्वेअर चेह-यासाठी राउंड फ्रेम असलेले गॉगल्स छान दिसतात. तसेच राउंड किंवा ओव्हल शेप चेह-यासाठी स्क्वेअर शेप फ्रेम सूट करेल.
» गॉगल्सच्या मधला भाग नाकावर येत असेल तर अशा गॉगल्समध्ये चेहरा लांब दिसतो. अशात गाल आणि डोळ्यांचा काही भाग दिसत असतो. अशी फ्रेम लहान चेहरा असणा-यांसाठी योग्य असते.
» जेव्हा गॉगल्सच्या मधला भाग ग्लासेसच्या अगदी मधोमध असल्यास लांब चेहरा लहान दिसतो. हा भाग खाली असल्यासही चेहरा लहान दिसतो. लांब चेहरा असल्यास ही फ्रेम सूट करते.
» मोठया फ्रेमचे सनग्लासेस फॅशनमध्ये असले तरी आपण गॉगल्सचा आकार आपल्या चेह-याप्रमाणे निवडावा. फॅशन म्हणून सामान्य चेह-यावर मोठे गॉगल्स लावल्याने पूर्ण चेहरा झाकला जातो.
» गॉगल्स लावल्यावर आपले नाक खेचले जात असेल तर हा आकार आपल्यासाठी योग्य नाही. आपण जरा मोठया आकाराचा गॉगल निवडायला हवा.
ही काळजी घ्या
» स्वस्त सनग्लासेस वापरू नये. नेहमी उत्तम क्वॉलिटीचे ग्लासेस खरेदी करा. स्वस्त ग्लासेसने डोळ्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो.
» गॉगल्स नेहमी त्याच्या कव्हरमध्ये ठेवावा आणि त्यांना नरम कपडयाने हलक्या हाताने पुसावे. ग्लासेसवर स्क्रेच पडता कामा नये.