गुहागर येथील अपरान्त भूमी पर्यटन विकास संस्था व गुहागरवासीय पर्यटनप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व २९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या गुहागर बीच फेस्टिवलनिमित्त पर्यटकांसह स्थानिक मंडळींना कोकणातील पारंपरिक व सांस्कृतिक लोककला व कोकणी पद्धतीच्या विविध खाद्यपदार्थाचा आनंद लुटता येणार आहे.
गुहागर – येथील अपरान्त भूमी पर्यटन विकास संस्था व गुहागरवासीय पर्यटनप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व २९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या गुहागर बीच फेस्टिवलनिमित्त पर्यटकांसह स्थानिक मंडळींना कोकणातील पारंपरिक व सांस्कृतिक लोककला व कोकणी पद्धतीच्या विविध खाद्यपदार्थाचा आनंद लुटता येणार आहे.
२८ रोजी सायंकाळी ५ वा. पर्यटन शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. शहरातील शिवाजी चौक येथून सुरू होणारी ही शोभायात्रा पोलिस परेड मैदानापर्यंत जाणार आहे. यामध्ये ढोलपथक, लेझीमपथक, बैलगाडी, वारकी, उंट, घोडे, एमसीसी पथक, पर्यटनप्रेमी आदींचा सहभाग असणार आहे. ही शोभायात्रा कार्यक्रमस्थळी आल्यानंतर सायंकाळी ६.३० वा. गुहागर बीच फेस्टिवलचे तसेच कोकण कला व खाद्य महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पं. स. च्या सभापती संपदा गडदे, उपसभापती राजेश बेंडल, नगराध्यक्ष जयदेव मोरे, उपनगराध्यक्ष स्नेहा वरंडे, उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे, तहसीलदार जीवन कांबळे, आदी उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमानंतर रात्री. ७.३० वा. ‘कोकणातील कला’ व ‘लोककलांचे दर्शन’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये येथील दुर्गास्तुती, दिंडी, पालखी नृत्य, नमन, मंगळागौर, जाखडी, कोळीनृत्य, शेतकरी नृत्य आदी कला प्रकार सादर होणार आहेत. रात्री. ९ वा. गीत व नृत्याचा सदाबहार कार्यक्रम ‘मेरी आवाज सुनो’ हा सादर होणार आहे.
२९ रोजी सकाळी ८ वा. गुहागर बीचवर पर्यटन रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६.३० वा. कोकणातील कला व लोककलांचे दर्शन सादर होणार असून, त्याअंतर्गत जाखडी नृत्य, पालखी नृत्य, नमन, मंगळागौर, शेतकरी नृत्य आदी कार्यक्रम सादर होणार आहेत. रात्री. ७.३० वा. पर्यटन संस्थेच्या वतीने काही मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून माजी आम. डॉ. विनय नातू, जि. प.च्या महिला व बालकल्याण सभापती स्मिता धामणस्कर, उर्विमाला पॅराडाइजचे विजय साळवी, सुवर्णदुर्ग शिपिंग कॉर्पोरेशनचे डॉ. चंद्रकांत मोकल, मांडके अॅण्ड मांडके डेव्हलपर्सचे सुधीर मांडके आदी उपस्थित राहणार आहेत. यानंतर रात्री.८.३० वा. महाराष्ट्राची लोककला, परंपरा आणि यशोगाथा उलगडून दाखवणारा ‘लावण्यसंध्या’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. या दोन दिवसांच्या गुहागर बीच फेस्टिवलचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपरान्त भूमी पर्यटन विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.