गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘गुलाब गँग’ या सिनेमाच्या प्रदर्शनावर दिल्लीच्या उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे
नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘गुलाब गँग’ या सिनेमाच्या प्रदर्शनावर दिल्लीच्या उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. ‘जुही चावला’ आणि ‘माधुरी दिक्षीत’ यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा येत्या सात मार्चला प्रदर्शित केला जाणार होता. मात्र आठ मेपर्यंत त्याला स्थगिती देण्यात आली आहे.
‘गुलाबी गँग’ च्या अध्यक्ष ‘संपत पाल’ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत बुधवारी न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणली आहे. या सिनेमाची कथा ‘गुलाबी गँग’वर आधारित आहे. मात्र हा चित्रपट बनवताना चित्रपट निर्मात्यांनी य़ाबाबत मला कोणतीही विचारणा केली नाही तसेच त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी मानहानीकारक दृश्ये चित्रपटात दाखवली असल्याचे संपत यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
याचिकेवर आठ मे ला पुढील सुनावणी केली जाणार आहे त्यामुळे पुढील सुनावणीनंतरच चित्रपट कधी प्रदर्शित होईल हे समजेल.