भारतीय हवाई दलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान शनिवारी जामनगर जिल्ह्यातील बेड गावाजवळ कोसळले. सुदैवाने वैमानिक वेळीच विमानाबाहेर पडल्याने या अपघातातून बचावला.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2014/05/MIG-21-fighter-plane-that-crashed.jpg)
जामनगर – भारतीय हवाई दलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान शनिवारी जामनगर जिल्ह्यातील बेड गावाजवळ कोसळले. सुदैवाने वैमानिक वेळीच विमानाबाहेर पडल्याने या अपघातातून बचावला.
वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने एका जलाशयात उतरला. हवाई दलाच्या हॅलिकॉप्टर्सनी नंतर या वैमानिकाला बाहेर काढले. वैमानिकाला या अपघातात किरकोळ दुखापत झाली.
मिग-२१ विमान जिथे कोसळले त्याच भागातील बेड आणि समर्थ गावाजवळ २०१२ मध्ये भारतीय हवाई दलाची दोन हॉलिकॉप्टर्स हवेत टक्कर होऊन कोसळली होती.
या अपघातात हवाई दलाच्या अधिका-यांसह नऊ जवानांचा मृत्यू झाला होता. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात नुकतेच मिग विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते.