सर्ज इंजिनमध्ये आघाडीवर असलेले गुगल सेवाकर देते फेसबुक मात्र हा कर का देत नाही असा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे.
नवी दिल्ली- सर्ज इंजिनमध्ये आघाडीवर असलेले गुगल सेवाकर देते फेसबुक मात्र हा कर का देत नाही असा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. तसेच याप्रकरणी योग्य ते प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गुगल कसे काय सेवाकर भरते आणि फेसबुक का भरत नाही? कोणत्या आधारावर फेसबुकला सवलत दिली जात आहे? आम्हाला ही गोष्ट समजत नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणी नेमके काय सुरु आहे याची तुम्हाला माहिती तरी आहे का, की हे प्रकरण तुमच्या समजण्याच्या पलीकडचे आहे असा प्रश्नही न्यायालयाने विचारला आहे. न्यायालयाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करताना सोशल मीडिया गाइडलाइन ही सादर करण्यास सांगितले आहे.