चिथावणीखोर वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे भाजपाचे वादग्रस्त नेते योगी आदित्यनाथ यांनी आता गायीला राष्ट्रमाता जाहीर करावे यासाठी अभियान सुरु केले आहे.
नवी दिल्ली – चिथावणीखोर वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे भाजपाचे वादग्रस्त नेते योगी आदित्यनाथ यांनी आता गायीला राष्ट्रमाता जाहीर करावे यासाठी अभियान सुरु केले आहे.
आपल्या या अभियानाला पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी अलिगडमध्ये मिसकॉल मोहीम सुरु केली आहे. उत्तरप्रदेश गोरखपूरमधून भाजपाचे खासदार असणारे योगी आदित्यनाथ कट्टरपंथीय विचारधारेचे समर्थन करणा-या हिंदू युवा वाहिनीचे सर्वेसर्वा आहेत.
गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा असल्याचे आदित्यनाथ आपल्या मागणीचे समर्थन करताना म्हणाले. भारताच्या सनातन परंपरेत गायीचे पूजनीय स्थान आहे. गायीचे गोत्र हा हिंदू धर्माचा कणा आहे. संपूर्ण जगात गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळू शकत नाही पण निदान भारतात तरी तो दर्जा मिळावा अशी आमची इच्छा आहे असे आदित्यनाथ म्हणाले.