पाटणा येथील गांधी मैदान येथे राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या जवानांना मंगळवारी तपासणी करत असताना आणखी एक बॉम्ब सापडल्याचे वृत्त आहे.
पाटणा- पाटणा येथील गांधी मैदान येथे राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या जवानांना मंगळवारी तपासणी करत असताना आणखी एक बॉम्ब सापडल्याचे वृत्त आहे. एसके मेमोरियल रुग्णालयाजवळ स्फोटक असलेली सुटकेस सापडली आहे.
भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या ‘हुंकार रॅली’ला काही तास शिल्लक असतानाच रविवारी पाटणा येथे सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात सहा जण ठार तर ८३ जण जखमी झाले होते. यातील पाच स्फोट गांधी मैदानात झाले होते.
या स्फोटानंतर पोलिसांना गांधी मैदान आणि पाटणा रेल्वे स्थानक परिसरात आठ जीवंत बॉम्ब सापडले होते. यानंतर पुन्हा मंगळवारी दुपारी एसके मेमोरियल येथे एक बॉम्ब सुटकेसमध्ये सापडला आहे. याची राष्ट्रीय सुरक्षा पथक तपासणी करत आहे.