गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवणा-या विशेष पोलिस कृती दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला.
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यात मालेवाडा भागातील खोबरामेंढा जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवणा-या विशेष पोलिस कृती दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी सोमवारी (एक एप्रिल) दुपारी एक वाजता अंदाधुंद गोळीबार केला.
पोलिसांनी स्वरक्षणार्थ नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले.पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाचा आसरा घेत पळून घेले. त्यानंतर सदर घटनास्थळाची पाहणी केली असता इलेक्ट्रीकल वायर आणि इतर नक्षल साहित्य सापडले.
पोलिस आणि नक्षलवादी यांच्या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर पोलिसांनी नक्षलवादी विरोधी अभियान तीव्र केले आहे.