नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेबाबत सुनावणी करताना सोमवारी न्यायालयाने केंद्रीय प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांना जामीन मंजूर केला.
मुंबई – भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेबाबत सुनावणी करताना सोमवारी न्यायालयाने केंद्रीय प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांना जामीन मंजूर केला.
आदर्श इमारतीमध्ये गडकरी यांच्या नावाने बेनामी फ्लॅट असल्याचा आरोप तिवारी यांनी केला होता. याप्रकरणी गडकरी यांनी २०१० मध्ये तिवारी यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना मुंबई सत्र न्यायालयाने तिवारी यांना दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
मनीष तिवारी यांनी केलेल्या आरोपामुळे पक्षाची आणि माझी बदनामी झाल्याचे गडकरी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते.