औरंगाबादमचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कुटुंबात एकाचवेळी विजय आणि पराभवाचे चित्र पाहायला मिळाले.
औरंगाबाद- औरंगाबादमचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कुटुंबात एकाचवेळी विजय आणि पराभवाचे चित्र पाहायला मिळाले.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत खैरे यांचा मुलगा पुत्र ऋषिकेश खैरे यांचा विजय झाला तर पुतणे सचिन खैरे यांना मात्र पराभवाचा धक्का बसला. प्रभाग क्रमांक ६८ मधून निवडणूक लढवणारे सचिन यांचा २४७ मतांनी विजय झाला.
तर सचिन खैरे यांना अपक्ष उमेदवार राजू तनवाणी यांनी पराभवाचा धक्का दिला. गुलमंडीमधून खैरे यांनी निवडणूक लढवली होती.
या निकालानंतर खैरे यांनी ‘हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते है’ अशी प्रतिक्रिया दिली. निकालानंतर खैरे आणि तनवाणी यांच्या समर्थकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते.