ऑस्ट्रेलियाचा कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार मायकल क्लार्कने त्याच्या पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत सचिन तेंडुलकरला स्थान दिले आहे.
मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार मायकल क्लार्कने त्याच्या पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत सचिन तेंडुलकरला स्थान दिले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमध्ये मी ज्या पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूंविरोधात खेळलो त्यात सचिन तेंडुलकरचा समावेश होतो असे क्लार्कने सांगितले. टि्वटरवरुन चाहत्यांशी संवाद साधताना क्लार्कने ही माहिती दिली.
ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न, ग्लेन मॅग्राथ, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर या पाच सर्वोत्तम क्रिकेपटूंसोबत आपल्याला क्रिकेट कारकीर्दीत खेळण्याची संधी मिळाल्याचे क्लार्कने सांगितले.
क्लार्कने एकदिवसीय आणि ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. कसोटी मालिकेसाठी क्लार्क सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहे.
तु खेळलेल्या गोलंदाजांमध्ये कुठला गोलंदाज तुला सर्वाधिक वेगवान वाटला ? या प्रश्नावर त्याने पाकिस्तानच्या शोएब अख्तरचे नाव घेतले. मात्र इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्रयू फ्लिंटॉफला क्लार्कने सर्वोत्तम गोलंदाज ठरवले.