कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी राज्यसभेचे खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र आणि नागपूर येथील उद्योजक मनोज जायस्वाल यांना दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.
नवी दिल्ली- कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी राज्यसभेचे खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र आणि नागपूर येथील उद्योजक मनोज जायस्वाल यांना दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.
खासदार दर्डा यांच्यासह, त्यांचा मुलगा देवेंद्र आणि एएमआर आर्यन अॅन्ड स्टील प्रा. लि. कंपनीचे जायस्वाल बंधू यांनी गैरव्यवहार करून कोळसा खाण मिळवल्याचा आरोप सीबीआयने ठेवून २७ मार्चला आरोपपत्र दाखल केले होते.
सात मे रोजी या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने त्यांना समन्स जारी केले होते. त्यावर या तिघांनीही शुक्रवारी न्यायालयात हजर राहून जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. खा. दर्डा यांच्यासह अन्य आरोपी तपासात योग्य ती मदत करत असल्याने त्यांना कोठडी देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत विशेष सीबीआय न्यायमूर्ती मधू जैन यांनी त्यांना प्रत्येकी दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देत असल्याचे सांगितले.