आशिया पॅसिफिक प्रदेशात कोटय़धीशांबाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर असून भारतात २ लाख ३६ हजार कोटय़धीश आहेत, अशी माहिती न्यू वर्ल्ड वेल्थच्या एशिया पॅसिफिक २०१६ वेल्थ रिपोटने दिली आहे.
नवी दिल्ली – आशिया पॅसिफिक प्रदेशात कोटय़धीशांबाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर असून भारतात २ लाख ३६ हजार कोटय़धीश आहेत, अशी माहिती न्यू वर्ल्ड वेल्थच्या एशिया पॅसिफिक २०१६ वेल्थ रिपोटने दिली आहे.
आशिया पॅसिफिक प्रदेशात उच्च निव्वळ उत्पन्न (हाय नेट वर्थ) असलेल्यांच्या क्रमवारीत भारत सर्वोच्च पाचमध्ये असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. १२ लाख ६० हजार कोटय़धीशांसह जपान या यादीत अव्वल स्थानी आहे. १० लाख डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त मालमत्ता असलेल्यांना या यादीत कोटय़धीश म्हणून स्थान दिले आहे. २०१५च्या अखेरीस जपानमध्ये १२ लाख ६० हजार कोटय़धीश होते. ६ लाख २४ हजार कोटय़धीशांसह चीन दुस-या क्रमांकावर असून ऑस्ट्रेलिया तिस-या स्थानावर २ लाख ९० हजार कोटय़धीश तेथे आहेत.
याच यादीत पहिल्या दहांमध्ये सिंगापूर २ लाख २४ हजार (पाचवे स्थान), हाँगकॉँग २ लाख १५ हजार (सहावे स्थान), दक्षिण कोरिया १ लाख २५ हजार (सातवे स्थान), तैवान ९८,२०० (आठवे स्थान), न्यूझीलंड ८९ हजार(नववे स्थान) आणि इंडोनेशिया ४८,५०० (दहावे स्थान) यांचा क्रम लागतो. एकूण खासगी मालमत्तेच्या बाबतीत भारत पहिल्या पाचात असला तरीही दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत मात्र भारत तळाला आहे, हे विशेष आहे.