कोट्यावधींचा कर चुकविणा-या १८ जणांची नावे आयकर विभागाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत.
नवी दिल्ली – कोट्यावधींचा कर चुकविणा-या १८ जणांची नावे आयकर विभागाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. या सर्वांनी ५०० कोटी रुपयांचा कर बुडविला आहे.
या यादीत जयपूर स्थित गोल्ड सुख ट्रेड इंडिया पहिल्या नंबरवर आहे. या कंपनीने ७५.४७ कोटी रुपयांचा कर बुडविला आहे. त्यानंतर अहमदाबादमधील ब्लू इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी लि. या कंपनीने ७५.११ कोटी कर थकविला आहे. गुजरातमधील अनेक कंपन्यांची नावे या यादीत सामाविष्ट आहेत.
करचुकवेगिरी करण-यांबाबतची माहिती मिळवण्यासाठी विभागाने हे पाऊल उचलले. सुरुवातीला विभागाच्या संकेतस्थळावर ही नावे टाकण्यात आली आहेत, असे एका अधिका-याने यावेळी सांगितले.
१० कोटीहून अधिक कर बुडविणा-यांची नावे सार्वजनिक करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.