लोकसभेत मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने ‘शॉडो’ कॅबिनेटची योजना तयार केली आहे.
नवी दिल्ली- लोकसभेत मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने ‘शॉडो’ कॅबिनेटची योजना तयार केली आहे. सरकारला नामोहरम करण्यासाठी सोशल मीडियाचा आधारही घेण्याचे कॉँग्रेसने ठरवले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मोदी सरकारचे निर्णय व महत्त्वाच्या खात्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कॉँग्रेसने सात शॉडो कॅबिनेट समित्या बनवल्या आहेत. या समितीत माजी मंत्री ए. के. अँटनी, एम. वीरप्पा मोइली, आनंद शर्मा, ऑस्कर फर्नाडिस, लोकसभेतील कॉँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभेतील कॉँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांचा समावेश आहे.
अर्थ, परराष्ट्र, व्यापार, माहिती-तंत्रज्ञान आदी विषयांबाबत वीरप्पा मोईली, आनंद शर्मा, ज्योतिरादित्य शिंदे तसेच गृह, संरक्षण, कायदा व न्याय विभागावर ए. के. अँटनी, अश्विनी कुमार आणि राजीव सातव तर दिग्विजय सिंह, अशोक चव्हाण आणि निनाँग इरिंग हे कृषी व जल व स्वच्छता खात्यावर नजर ठेवतील. मल्लिकार्जुन खर्गे रेल्वे तर कामगार खात्यावर ऑस्कर फर्नाडिस व रणजीत राजन यांचे लक्ष असेल. मनुष्यबळ, पंचायती राज आणि ईशान्य भारत खात्यावर मणिशंकर अय्यर, भालचंद्र मुणगेकर आणि सुश्मिता देव यांचे लक्ष असेल.