एका पंधरा वर्षीय मुलीवर चार महिने सतत अत्याचार करणा-या एका ख्रिश्चन धर्मगुरूला मंगळवारी केरळ पोलिसांनी अटक केली. फादर एडविन फिगारेज असे या ४१ वर्षीय प्रिस्टचे नाव आहे.
कोची- एका पंधरा वर्षीय मुलीवर चार महिने सतत अत्याचार करणा-या एका ख्रिश्चन धर्मगुरूला मंगळवारी केरळ पोलिसांनी अटक केली. फादर एडविन फिगारेज असे या ४१ वर्षीय प्रिस्टचे नाव आहे.
सहा महिन्यांपासून तो फरार होता. अखेर त्याला पकडण्यात यश मिळाले. ही मुलगी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आली असता फादरने तिला पाहिले आणि तेथूनच या प्रकरणाला सुरुवात झाली.
मुलीच्या वागण्यात झालेला बदल शाळेतील शिक्षकांच्या लक्षात आल्यावर तसेच मुलीने आपल्या आई-वडिलांना आपल्यावरील लैंगिक अत्याचारांची माहिती दिल्यावर हा गुन्हा उघड झाला.
नववीतील या मुलीला २८ मार्चपर्यंत लैंगिक छळाला सामोरे जावे लागत होते. तक्रार दाखल झाल्यावर फादर दुबईला पळून गेला होता. अटकपूर्व जामिनाची मुदत संपल्यावर मंगळवारी तो कोची न्यायालयात शरण आला.