एएपी पक्षाबद्दल अण्णांनी आपली भूमिका का बददली असा थेट सवाल केजरीवाल यांनी अण्णांना केला आहे.
नवी दिल्ली – केजरीवाल यांच्या एएपी पक्षाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा देणार नाही अशी ताठर भूमिका घेतली होती. या मुद्दयावर त्यांचं मत जाणून घेण्यासाठी अरविंद केजरीवाल अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत. एएपी पक्षाबद्दल अण्णांनी आपली भूमिका का बददली असा थेट सवाल केजरीवाल यांनी अण्णांना केला आहे.
काही दिवसापूर्वी एएपी पक्षाबाबत अण्णांची भूमिका सकारात्मक होती. पक्ष स्थापल्यानंतर त्यांनी आमचे अभिनंदन केले होते. त्याशिवाय एएपीला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. मात्र आता असे काय झाले की त्यांनी आपली भूमिका बददली ? आमचे जर काही चूकत असेल तर अण्णांनी जरुर सांगावे. आम्ही त्यात बदल नक्कीच करु असे केजरीवाल यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
केजरीवाल यांनीही इतर राजकारण्यांप्रमाणेच पैसा कमावण्यासाठी पक्ष स्थापन केला आहे. आम्ही या पक्षाला पाठिंबा देणार नाही, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लावला होता. गुरुवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.