आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, काँग्रेसकडून अजय माकन आणि भाजपाच्या किरण बेदी यांनी बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला.
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, काँग्रेसकडून अजय माकन आणि भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरला.
केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून तर किरण बेदी कृष्णानगर मतदार संघामधून ही निवडणूक लढवणार आहेत.
काँग्रेसकडून अजय माकन यांनीही बुधवारी उमेदवारी अर्ज भरला. ते सदर बाजार मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. किरण बेदी आणि केजरीवाल हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका काँग्रेस नेते अजय माकन यांनी यावेळी केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.