केंद्रीय मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या श्रीनगर येथील खन्यार भागात निवडणूक सभेदरम्यान स्फोट झाल्याची घटना रविवारी घडली.
श्रीनगर – केंद्रीय मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या श्रीनगर येथील खन्यार भागात निवडणूक सभेजवळ स्फोट झाल्याची घटना रविवारी घडली.
खन्यार येथील सभेदरम्यान स्फोट झाल्याचा मोठा आवाज ऐकू आला. याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला हे खनयार येथे आले होते. यावेळी नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी सभेपासून काही अंतरावर ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात अद्याप कोणही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.