दिल्लीच्या भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी शनिवारी आप नेते कु्मार विश्वास यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.
नवी दिल्ली – दिल्लीच्या भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी शनिवारी आप नेते कु्मार विश्वास यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.
तीन दिवसांपूर्वी एका निवडणूक प्रचारसभेमध्ये बोलताना कुमार विश्वास यांनी आपल्याबद्दल अश्लील विधान केल्याचा आरोप किरण बेदी यांनी केला आहे. या प्रकरणी बेदी यांनी कुमार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याचाही इशारा दिला आहे.
आठमुठया विचारसरणीच्या आप नेतृत्वाकडून महिलांना काय सुरक्षा आणि प्रतिष्ठा मिळणार असे टि्वट बेदी यांनी केले आहे. त्यावर कुमार विश्वास यांनी टि्वटरवरुनच मी जे बोललो ते बेदींविरोधात बोललो हे भाजपाने सिध्द करुन दाखवावे असे प्रतिआव्हान दिले आहे.
कुमार विश्वास यांनी त्या सभेचा व्हिडीओही टि्वटरवर अपलोड केला आहे. किरण बेदी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून कुमार विश्वास सातत्याने बेदी यांना लक्ष्य करत आहेत.