आम आदमी पक्षाचे अमेठीमधील उमेदवार कुमार विश्वास, आपचे नेते सोमनाथ भारती आणि अन्य दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अमेठी – प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे अमेठीमधील उमेदवार कुमार विश्वास, आपचे नेते सोमनाथ भारती आणि अन्य दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लोकप्रतिनिधी कायदा आणि कलम १८८ अंतर्गत विश्वास, भारती, सत्येंद्र दुबे आणि पंकज शुक्ला यांच्या विरोधात अमेठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमेठीमध्ये प्रचाराची मुदत सोमवारी संध्याकाळी सहा वाजता संपल्यानंतरही आपने प्रचार सुरु ठेवल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.