अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप असलेले आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास हे आज दिल्ली महिला आयोगासमोर उपस्थित राहणार नाहीत.
नवी दिल्ली – अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप असलेले आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास हे आज दिल्ली महिला आयोगासमोर उपस्थित राहणार नाहीत.
विश्वास यांना आतापर्यंत महिला आयोगाकडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असे ‘आप’चे नेते सोमनाथ भारती यांनी सांगितले.
‘आप’मधील महिला कार्यकर्तीने विश्वास यांच्यावर अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणाची तक्रार आयोगाकडे दाखल केली होती. या प्रकऱणी आयोगाने विश्वास यांना मंगळवारी आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले.
दरम्यान, कुमार विश्वास यांना बजावलेल्या नोटीसमध्ये सर्व तपशील देण्यात आल्याचे आयोगाच्या प्रमुख बरखा सिंग यांनी सांगितले.