कुपवाडा जिल्ह्यातील केरान सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारल्याचे वृत्त आहे.
श्रीनगर- कुपवाडा जिल्ह्यातील केरान सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारल्याचे वृत्त आहे.
कुपवाडा जिल्ह्यातील भारत- पाकिस्तान सीमेवर गस्त घालणा-या सुरक्षा जवानांची दहशतवाद्यांशी जोरदार चकमक झाली. यात भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारल्याचे वृत्त आहे.
गुरुवारी पहाटे उत्तर काश्मीरमधील केरान सेक्टरमध्ये रोहतागली भागात जोरदार शोध मोहीम राबवण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. ठार झालेल्या दहशतवाद्यांजवळ दोन एके रायफल, अन्य शस्त्र आणि दारुगोळा सापडला.