किरण बेदी यांचा अचानक भाजप प्रवेश झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर जी चर्चा सुरु आहे त्यामुळे भाजपतंर्गत अस्वस्थतता निर्माण झाली आहे.
नवी दिल्ली – माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा अचानक भाजप प्रवेश झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर जी चर्चा सुरु आहे त्यामुळे भाजपतंर्गत अस्वस्थतता निर्माण झाली आहे.
पश्चिम दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांच्या विधानावरुन ही पक्षांतर्गत नाराजी उघड झाली. किरण बेदी या सध्या फक्त कार्यकर्त्या आहेत त्यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा निवडणूक प्रचारात उत्तम पर्याय ठरेल असे मत मनोज तिवारी यांनी व्यक्त केले.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चार दिवसातच बेदी ज्या प्रकारे स्वत:ला मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून प्रस्तुत करत आहेत ते दिल्ली भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना आवडलेले नाही असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
किरण बेदी या सध्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी सुध्दा स्वत:ला तसेच समजावे असे तिवारी पत्रकारांना म्हणाले. मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा असलेले दिल्ली भाजपमधील दुसरे नेते जगदीश मुखी म्हणाले की, मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचे नाव प्रस्तुत करायचे किंवा निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवायचा याचा निर्णय पक्षनेतृत्व घेईल.