किरण बेंदीच्या भाजपाप्रवेशाबाबत अण्णा हजारेंना विचारले असता त्यांनी कोणतेही विधान करण्यास नकार दिला.
राळेगण सिद्धी – यंदाची दिल्ली विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगणार आहे. एकेकाळी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीत खांद्याला खादा लावून काम कऱणारे अरविंद केजरीवाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यंदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोघांमध्ये जोरदार वाकयुद्धही सुरु आहे. असे असतानाही याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मात्र मौन बाळगले आहे.
किरण बेंदीच्या भाजपाप्रवेशाबाबत अण्णा हजारेंना विचारले असता त्यांनी कोणतेही विधान करण्यास नकार दिला. ‘किरण बेंदीबाबत मला काहीही बोलायचे तसेच कोणतेही विधान करायचे नाही. राजकारण हे घाणेरडे आहे,’ असे अण्णा म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच किरण बेदी यांनी भाजपात प्रवेश केला. तसे गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीआधीच त्यांनी राजकारणात प्रवेश कऱणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने दिल्ली मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून बेदींचे नावही जाहीर केले. बेदी यांनी बुधवारी निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल केला. त्या कृष्णनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.