भाजपाच्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याकडे दोन विविध ठिकाणांचा पत्ता असलेली दोन मतदान ओळखपत्रे असल्याची माहिती समोर येत आहे.
नवी दिल्ली – भाजपाच्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याकडे दोन विविध ठिकाणांचा पत्ता असलेली दोन मतदान ओळखपत्रे असल्याची माहिती समोर येत आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, बेदींकडे उदय पार्क आणि तालकोटा लेन येथील ठिकाणांची दोन विविध मतदान ओळखपत्रे आहेत.
‘याबाबतची माहिती मिळाली असून तालकोटा लेनचा पत्ता असलेले ओळखपत्र रद्द करण्यासाठी बेदींनी कोणताही अर्ज केला आहे का याबाबत चौकशी सुरु आहे. लवकरच या प्रकरणी अंतिम निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचू,’ असे निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी यावेळी सांगितले. तसेच बेदींनी दोन्हीपैकी एक ओळखपत्र रद्द कऱण्यासाठी अर्ज केला नसल्याचे आढळल्यास त्यांच्यावर अधिकृत कारवाई केली जाईल असे संकेतही अधिका-यांनी यावेळी दिले. याप्रकरणी बेदींना विचारले असता त्यांनी कोणतेही विधान करण्यास नकार दिला.
बेदी यांच्याकडे उदयपार्क या ठिकाणचा पत्ता असलेले TZD1656909 या क्रमांकाचे ओळखपत्र आहे तर तालकोटा लेन येथील पत्ता असलेले SJE0047969 या क्रमांकाचे दुसरे ओळखपत्र आहे.