दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा पथकांबरोबर रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2014/12/jawan.jpg)
श्रीनगर – दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा पथकांबरोबर रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. एक पोलिस कर्मचारी या चकमकीत जखमी झाला.
या चकमकी विरोधात या भागातील युवकांनी आंदोलन केले. काही युवकांनी सुरक्षापथकाच्या दिशेने दगडफेक केली. रातनीपोरा आणि नारु गावातील शेतामध्ये झालेल्या चकमकीत हे दोन्ही दहशतवादी ठार झाले.
या चकमकीत एक पोलिस जवानही जखमी झाला. या भागात अजूनही शोध मोहिम सुरु आहे. सुरक्षापथकांना रातनीपोरा भागामध्ये दहशतवादी असल्याची टीप मिळाली होती.
त्याआधारावर पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी रात्रीच्या सुमारास घेराबंदी करुन शोधमोहिम सुरु केली होती. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवनांच्या दिशेने गोळीबार प्रथम सुरु केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले.