काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधर सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणा-या दहशतवाद्यांचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला.
श्रीनगर- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधर सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणा-या दहशतवाद्यांचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला.
रविवारी सकाळी तंगधर सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळील शस्त्रास्त्रांचा मोठा साठा घेऊन दहशतवाद्यांचा समूह घुसखोरी करण्याचा प्रयत्नात होते. यावेळी भारतीय जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. अद्यापही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती लष्कर अधिका-यांनी दिली.
या गोळीबारात कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तंगधर सेक्टरमध्ये दहशवाद्यांनी घुसखोरी करण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
२५ मे रोजीही या भागात घुसखोरांना रोखण्याच्या प्रयत्नात तीन जवान हुतात्मा झाले होते. तर एक दहशतवादी ठार झाला होता.