रविवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास कांजूरमार्ग पूर्व येथील अशोकनगर परिसरात दरोडेखोरांच्या टोळीने सुमारे १४, १५ घरफोडया करून रोख रक्कम व दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लुटून पाबोरा केला.
मुंबई- रविवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास कांजूरमार्ग पूर्व येथील अशोकनगर परिसरात दरोडेखोरांच्या टोळीने सुमारे १४, १५ घरफोडया करून रोख रक्कम व दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लुटून पाबोरा केला.
सदर घटनेची माहिती मिळताच नगरसेवक धनंजय (दादा) पिसाळ घटनास्थळी जाऊन ताबडतोब स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये फोन करून घडलेल्या घटनेची माहिती देऊन कांजूरमार्ग पोलीस ठाणे येथील अधिकारी वर्गाला पाचारण केले आणि कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने, पोलीस उपनिरीक्षक सुरळकर आणि अधिकारी वर्गानी तातडीने पंचनामा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
उन्हाळ्यात बहुतांश रहिवासी गावी जात असल्यामुळे घरफोडीच्या घटना घडू नयेत त्याकरिता विभागात चाळींमध्ये पोलिसांनी गस्त घालावी तसेच आज घडलेली घटनेमधील दरोडेखोरांना तात्काळ अटक करून लोकांचा मुद्देमाल लवकरात लवकर सुखरूप परत मिळाण्याकरिता प्रयत्न करावेत, अशी विनंती नगरसेवक धनंजय (दादा) पिसाळ यांनी सहाय्यक आयुक्त भांडुप परिमंडळ आणि सातपुते (वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांजूरमार्ग पोलीस ठाणे ) यांना केली.
दरम्यान, या घरफोडीत अंदाजे ४० ते ४५ तोळे सोन्याचे दागिने असा दोन ते तीन लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
» अशोकनगर परिसरात रविवारी पहाटे १५ घरफोडया
» तीन लाखांचा मुद्देमाल लंपास
» रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण