राजधानी दिल्लीतील सरकार स्थापन करण्याच्या घटनेत शुक्रवारी रात्री अचानक वेगळे वळण मिळाले असून काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी आपला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला आहे.
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील सरकार स्थापन करण्याच्या घटनेत शुक्रवारी रात्री अचानक वेगळे वळण मिळाले. काँग्रेस आणि भाजपने आम आदमी पक्षाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आम्ही सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस आणि भाजपने आपला कोणत्याही अटी न घालता पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसने दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांना पत्र लिहून आपला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान नजीब जंग यांनी आपला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले होते. आपचे नेते अरविंद केजरीवाल शनिवार सकाळी नायब राज्यपालांची भेट घेणार आहेत.