काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड आज केली जाणार आहे. वि
मुंबई – काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड आज केली जाणार आहे. विधानभवनात दुपारी दोन वाजता ही बैठक होईल. या बैठकीसाठी काँग्रेसच्या विधानपरिषद आणि विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या बैठकीसाठी काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक म्हणून लोकसभेतील पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहतील. या बैठकीत आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर विधिमंडळ पक्षाचा नेते निश्चित केला जाईल. दरम्यान नव्या दमाच्या नेत्याला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जावा, अशी मागणी काँग्रेसच्या काही आमदारांनी केली आहे.
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनीही अशाच पद्धतीची मागणी केली असून नव्या रक्ताला वाव द्यावा, असे जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसचा विधिमंडळ नेता कोण असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.