काँग्रेससारख्या मोठय़ा पक्षांवर आरोप करून त्यांचे नुकसान करायचे आणि त्यांची जागा घ्यायची, असे दिवास्वप्न अरविंद केजरीवाल बघत असल्याची जोरदार टीका केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी सोमवारी केली.
नवी दिल्ली : काँग्रेससारख्या मोठय़ा पक्षांवर आरोप करून त्यांचे नुकसान करायचे आणि त्यांची जागा घ्यायची, असे दिवास्वप्न अरविंद केजरीवाल बघत असल्याची जोरदार टीका केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी सोमवारी केली. केजरीवाल चालवत असलेल्या स्वयंसेवी संस्थांना परदेशातून देणगी मिळते, इतरांवर चिखलफेक करण्याआधी त्यांनी त्याचे उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टच्या नावावर पैशांचा अपहार केल्याचा केजरीवाल यांचा आरोपही खुर्शीद यांनी पुन्हा फेटाळून लावला.