कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी काँग्रेस सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला.
मेहसाणा- कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विशेष चौकशी समितीपुढे हजर रहावे अशी मागणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सुरुवातीला मोदींनी कोळसा खाणवाटपावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली. या प्रकरणी काँग्रेस सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
गुजरात काँग्रस आणि गुटखा मुक्त करा अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीप्रमाणेच केंद्रातील काँग्रेस सरकार आणि पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग कॅगचा वापर करुन घेत असल्याचे टीका त्यांनी केली.