ज्येष्ठ विचारवंत आणि कन्नड विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी रुद्रगौडा पाटील याची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई- ज्येष्ठ विचारवंत आणि कन्नड विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकरी रुद्र गौडा – पाटील याची हत्या झालाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याला रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी दुजोरा दिलेला नसला तरी त्याच्या चेह-याशी साधम्र्य असणारा मृत्य देह बेळगाव जवळच्या खानपूर जंगलात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
बेळगाव जवळच्या खानपूर जंगलात कर्नाटक पोलिसांना बुधवारी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे. हा मृतदेह कलबुर्गी यांच्या हत्येचा संशय असलेल्या रुद्र पाटील याच्या चेह-याशी साधर्म्य साधणार आहे.
याबाबत पोलिसांनी अत्यंत सावध पवित्र घेतला असून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास पोलीस टाळत आहेत. प्रथम मृतदेहाची सतत्या पडताळली जाईल. खात्री होत नाही, तोपर्यंत काही सांगणे उचित ठरणार नाही, असे बेळगावचे पोलिस अधीक्षक रविकांत गौडा यांनी सांगितले.
डॉ. कलबुर्गी यांची हत्या त्यांच्या राहत्या घरीच झाली होती. त्यापूर्वी कोल्हापूर येथे कॉ. पानसरे यांचीही हत्या त्याच पद्धतीने झालेली होती. डॉ. पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी समीर गायकवाड याला अटक केली होती. त्यावेळी जो तपास करण्यात आला आहे, त्यात या दोन्ही हत्या प्रकरणाचा सूत्रधार रुद्र गौडा-पाटील असल्याची माहिती पुढे येत होती.
डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येने नंतर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी काही रेखाचित्रे तयार केली होती. बुधवारी खानापूरच्या जंगला जो मृतदेह सापडला आहे, त्याचा चेहरा डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर तयार करण्यात आलेल्या रेखाचित्राशी जुळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मृतदेह खरोखर रुद्र गौडा – पाटील याचाच आहे की, त्याच्या चेह-याशी मिळता जुळता असणा-या दुस-याच व्यक्तीची हत्या करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, याबाबत पोलीस कसून तपास करीत आहेत.
दाभोलकर हत्या प्रकरण: संशयितांची नावे न्यायालयात सादर
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाच्या प्रदीर्घ तपासानंतर सीबीआयने दोन संशयित आरोपींची नावे बंद लिफाफ्यामधून मुंबई उच्च न्यायालयात सादर केली. पुणे पोलिसांनी तपासात असमर्थता दर्शवल्यानंतर दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
तपासानंतर सीबीआयने दोन संशयिताची नावे उच्च न्यायालयात सादर केली. रुद्रगौडा पाटीलबद्दल अहवाल सादर न केल्यामुळे न्यायालयाने सीबीआयवर ताशेरे ओढले. पाटीलबद्दल अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तरीही सीबीआय बुधवारीही आपला अहवाल सादर करू शकली नाही.